This is short story behind what is "Tiryaford dictionary..." Which i am dedicating to all the MB members.. We all schoolmates met after a long break near about 16-17 years. Really thankful to the social network which is the only way for us to find and met each other. It is not easy to be connected with your dear ones very easily, that's why appreciate the social network though it is discussed with negative approach mostly. Various characters are making a group which is forever because all of them accepts each character as it is.so today i am describing one of the character.
खूप वर्षांनी ठरवून एकत्र जमलेले मित्र आणि मैत्रिणीं शाळेच्या आठवणी गुंफत होते. सुंदर अशी सुय्रास्तः ची वेळ, आकाशात पसरलेला तो मंद सुर्यकिरणाचा भगवा रंग … आणि त्यात रंगलेली गप्पांची मैफिल … साथ द्यायला होताच की फक्कड चहा, कॉफी आणि बंडूचे special वड़े.
मग सुरुवात झाली एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याची … सुरुवात केली प्रणालीने… अजून हि तशीच शाळेतला पहिला क्रमांक इथेहि सोडला नाही आणि शेवट आमच्या डॉक्टर साहेबांनी (राहुल) कारण पूर्ण वर्ग सांभाळण्याची (monitor) जबाबदारी इथे त्यांनीही पूर्ण केली. मग ह्या परिचय सत्रानंतर जागा घेतली ती शाळेत असताना झालेल्या मौज मस्तीच्या आठवणींनी. ती जागा दिली परदेशात असणारया अंजलीने …म्हणाली किती रे छान होते ते दिवस… पुन्हा कधीहि न परतणारे. सगळे मग्न झाले होते गप्पा मारण्यात … अचानक! एक विचारू का? असा प्रस्ताव आला. सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने बघितले आणि संजुक्ता म्हणाली बोला.. "टिरी मास्टर" नाही जरी म्हणालो तरी विचारणारच ना! विचारा नाहीतर पोट दुखणार उगीच … हंम्म करा सुरु. प्रश्न असा आहे कि…विचारू का नक्की? सगळे एका सुरात ओरडले, अरे …. राहू दे नको विचारू . हास्याचा कल्लोळ थांबवत सचिन म्हणाला बरं ऐकूनच घ्या आता… अहंम अहंम
शेणफडू ला इंग्रजीत काय म्हणतात? सांगा.
हे ऐकता क्षणी लगेच निखिल म्हणाला मी देतो उत्तर पण आधी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. होकारार्थी मान हलवत सचिन म्हणाला 'तू भी क्या याद रखेगा' विचार बिनधास्त. ऐक मग … अस म्हणत निखिलने विचारले "माहेर आणि सासर ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?" सांग आता. एका क्षणाचीसुद्धा वाट न बघता सगळ्यांनी घेरले पोलिसाला ( सचिनला). काय झाले रे शेणफडू … उत्तर दे. लगेचच रितेश त्याची खोटी बाजू घेत म्हणाला अरे! काय चालु रे भो थांबा… जरा वेळ द्या त्याला. हो ना… काय हे ... टिरी मास्टरला शोधू तर द्या .... टिर्या! ….निरज साथ देत म्हणाला.
ओह... असय होय कुठे शोधायच्या असतात त्या धनश्रीने म्हणाली. मग त्याला पुढे एकही शब्द बोलण्याची संधी मिळाली नाही. कारण सुरुवात झाली होती Dictionary च्या शोधाची.
अग ! त्याची एक special dictionary आहे ग …ती झाम्बल्तोय तो. त्यातून सांगणार काय म्हणतात इंग्लिश मध्ये ते. कोणती ती ? सगळ्यांचा एकाच आवाजात प्रश्न आला.
टिरी मास्टर आहे ना तो…मग! त्याची Dictionary पण special त्याच्या सारखी…. Tiryaford Dictionary निशाने उत्तर दिले आणि हळूच विचारले राग आला का रे पोलिस?
हसू आवारत आमचा Tiryaford म्हणाला... बघा किती हसवले मी सगळ्यांना.. Born talented आहे मी. Oxford तर Oxford.
Oxford नाही हो Tiryaford …. Tiryaford …. अमिताने निर्णायक शिक्कामोर्तब केला.
असा हा आमचा Tiryaford …आणि त्याची Tiryaford Dictionary.


